Annasaheb Patil Loan Scheme: नमस्कार मंडळी, राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी राज्य शासनाने अण्णासाहेब पाटील Annasaheb Patil आर्थिक मागास विकास महामंडळाची स्थापना दिनांक २७/११/१९९८ रोजी केली आहे. राज्यातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांचा आर्थिक विकास करण्याकरता, विशेष करून या घटकातील बेरोजगार युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या युवकांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ याची स्थापना करून या मार्फत रोजगार निर्मिती साठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगाराबाबतची माहिती मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य करण्यात येते.
आजच्या या लेखामार्फत आपण अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? annasaheb patil mahamandal या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा? पात्रता आवश्यक कागदपत्रे काय लागतात? यासंबंधीची संपूर्ण माहिती या लेखामार्फत जाणून घेणार आहोत.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना काय आहे? अण्णासाहेब पाटील कर्ज योजना मराठी
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी सन १९९८ मध्ये Annasaheb Patil Loan Scheme 2024 ची स्थापना करण्यात आली. आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या घटकांपर्यंत विशेष करून बेरोजगार तरुणांपर्यंत पोहोचवून त्यांना सक्षम बनवणे, योजना राबवून रोजगाराच्या व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, आर्थिक दृष्ट्या मागास घटकांचा सामाजिक विकास घडवून आणणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan| अण्णासाहेब पाटील मराठा कर्ज योजना
या योजनेद्वारे खालील योजना राबवल्या जातात
१) वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (योजना कोड – IR-I)
२) गट कर्ज व्याज परतावा योजना (योजना कोड – IR-II)
३) गट प्रकल्प कर्ज योजना (योजना कोड – GL-I)
Annasaheb Patil Loan Scheme 2024 : अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ योजनेची उद्दिष्टे
★ अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मार्फत राबवल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल व मागास तसेच बेरोजगार तरुणांना आर्थिक हातभार लावून त्यांना सक्षम बनवणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.
★ त्याचबरोबर तरुणांना या योजनेअंतर्गत समाविष्ट करून रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
मराठा समाजातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या आणि दुर्बल घटकांचा विकास घडवून आणणे.
★ मराठा समाजातील तरुणांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक मजबूत पाया उभारणे.
★ राज्यातील बेरोजगारीच्या समस्येवर मात करण्यासाठी योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या घटकांना आत्मनिर्भर बनवणे आणि समाजातील त्यांच्या स्थितीत सुधारणा करणे. Annasaheb Patil Loan Scheme
annasaheb patil loan documents list : अण्णासाहेब पाटील कर्ज योजना कागदपत्रे
अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी ऑनलाईन रेजिस्ट्रेशन करताना आवश्यक कागदपत्रे पुढील प्रमाणे
✧ आधार कार्ड
✧ पॅन कार्ड
✧ मोबाईल नंबर
✧ जातीचा दाखला
✧ ई-मेल आयडी
✧ उत्पन्न दाखला (वार्षिक उत्पन्न ८ लाखांपेक्षा जास्त नसावे)
✧ वयाचा दाखला
✧ पासपोर्ट साईज फोटो
✧ प्रकल्प अहवाल
✧ बँक कर्ज मंजूर पत्र
✧ व्यवसायाचे फोटो
Annasaheb Patil Arthik Vikas Mahamandal Loan
annasaheb patil loan bank list : अण्णासाहेब पाटील लोन बँक लिस्ट
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत समाविष्ट बँकांची यादी annasaheb patil mahamandal bank list खाली pdf स्वरुपात दिली आहे.
अण्णासाहेब पाटील कर्ज योजना contact number
अण्णासाहेब पाटील महामंडळ योजनेअंतर्गत Annasaheb Patil Loan Scheme कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करताना अर्जदाराला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ही बाब लक्षात घेता, शासनाने पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक सोबतच 24 तास चालणारी नागरी संपर्क केंद्रे तयार केली आहेत. यासंबंधीची सर्व माहिती खालील प्रमाणे आहे. खाली दिलेल्या पत्त्यावर किंवा ईमेल आयडी ने तसेच कॉन्टॅक्ट नंबर वर कॉल करून तुम्ही या संबंधीची संपूर्ण माहिती मिळू शकता आणि आपल्या शंकांचे निराकरण करू शकता.
पत्ता
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मर्यादित.
जी. टी. हॉस्पिटल कंपाउंड,
बर्रुद्दिन तय्यब्बजी मार्ग,
जे. जे स्कूल ऑफ आर्ट्स च्या पाठीमागे,
सी.एस.टी स्टेशन जवळ. मुंबई 400 001
Email : apamvmmm[at]gmail[dot]com
Contact Number : 022-22657662 / 022-22658017
24×7 नागरी संपर्क केंद्र : 1800-120-8040
मुंबई विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
पुणे विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
नाशिक विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
संभाजीनगर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
अमरावती विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
नागपूर विभाग पत्ता आणि संपर्कासाठी
अण्णासाहेब पाटील महामंडळ कर्ज योजना व्यवसाय यादी 2024 : Annasaheb Patil Loan Scheme
☞ वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (IR-I)
☞ गट कर्ज व्याज परतावा योजना (IR-II)
☞ गट प्रकल्प कर्ज योजना (GL-I)
☞ अण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना
☞ अण्णासाहेब पाटील कर्ज योजना पोल्ट्री फार्म
Annasaheb Patil Loan apply online : अण्णासाहेब पाटील महामंडळ बिनव्याजी कर्ज साठी अर्ज कसा करावा ?
✦ अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
✦ त्यानंतर होम पेजवर नोंदणी करा यावर क्लिक करा.
✦ आता तुमच्यासमोर नवीन नोंदणी करण्यासाठी तुमची माहिती विचारली जाईल ती सर्व माहिती भरायची आहे. सर्व माहिती भरून झाल्यावर पुढे बटनावर क्लिक करा. Annasaheb Patil Loan Scheme
✦ आता येथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड दिला जाईल त्याचा वापर करून लॉगिन करायचे आहे.
✦ आता पुढे लॉगिन झाल्यावर अर्ज करण्यासाठी क्लिक करा पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्ह्याची निवड करावी लागेल.
✦ पुढे तुम्हाला वैयक्तिक माहिती आणि व्यवसायाची माहिती असलेला तपशील भरायचा आहे.
✦ त्यानंतर पुढे विचारलेले सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहे.
✦ वरील सर्व माहिती भरल्यानंतर आपली या योजनेअंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.