प्रधानमंत्री सूर्योदय योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा | PM Suryoday Yojana 2024 | प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे? कोणाला मिळेल लाभ ? असा करा अर्ज

नमस्कार मंडळी, गेल्या काही दिवसांपासून देशातील १ कोटी नागरिकांना मोफत सोलर पॅनल बसवून देण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्यावरून परतल्यानंतर केले आहे. हा लाभ एका नवीन योजनेद्वारे देण्यात येणार आहे ती योजना PM Suryoday Yojana 2024 म्हणजे होय.

आता नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये सरकारने रूप-टॉप सोलरशी संबंधित प्रधानमंत्री सूर्योदय योजना या नवीन योजनेची घोषणा केली आहे. ह्या योजनेअंतर्गत सुरुवातीला एक कोटी कुटुंबीयांना सोलर रूप टॉप लावण्यासाठी सरकार मदत करणार आहे. त्यामुळे जवळपास एक कोटी नागरिकांचे लाईट बिल हे शून्य होणार आहे.

त्याचबरोबर सामान्य कुटुंबातील व्यक्ती आपल्याच घरी वीज निर्मिती करून ती विकून कमाई ही करू शकतात. आणि यासाठी संपूर्ण खर्च केंद्र सरकार उचलणार आहे. तरी PM Suryodaya Yojana या योजनेअंतर्गत अर्ज कसा करायचा? या योजनेचा लाभ कोणाला मिळणार? या योजनेसाठी सरकार किती अनुदान देणार? यासंबंधी संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत. तरी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा आणि ही महत्त्वाची माहिती आवडली असेल तर पुढे नक्की शेअर करा.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना फायदे : Benifits of PM Suryoday Yojana 2024

केंद्र सरकार द्वारे वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जात आहेत. अशातच देशातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना विजेचा लाभ घेता यावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच PM Suryoday Yojana 2024 ची घोषणा केली आहे. या योजनेद्वारे देशातील तब्बल एक कोटी गरीब ते मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांच्या छतावर सोलर पॅनल लावून त्यापासून वीज निर्मिती करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे विजेची बचत होणार असून, नवीन वीज कनेक्शन नोंदणी आणि इतर समस्यांपासून नागरिकांची सुटका होणार आहे. या योजनेमध्ये सरकार ३०० युनिट पर्यंत वीज मोफत देणार आहे.

PM Suryoday Yojana Subsidy: प्रधानमंत्री सूर्योदय योजना अनुदान

सर्व माहिती मिळाल्यानंतर आता आपल्या मनामध्ये एक प्रश्न आला आले असेल की, PM Suryoday Yojana 2024  या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सरकार किती टक्के अनुदान देणार? तर एका अधिकृत सरकारी वेबसाईट नुसार, तीन किलो वॅट ची क्षमता असलेल्या सोलरप्लांटची प्रकल्पाची अंदाजे किंमत १ लाख २६ हजार रुपये आहे. त्यापैकी ५४ हजार रुपये सरकारकडून अनुदान दिले जाते.

हे सुद्धा वाचा :- महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2024 | MahaDBT Farmer Scheme List , महाडीबीटी लॉटरीची नवीन लिस्ट/यादी आली, येथे पहा आणि डाउनलोड करा

प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत अर्थात तुमच्या घरावर सोलर पॅनल बसवण्यासाठी तुम्हाला ७२ हजार रुपये खर्च करावा लागू शकतो. या सोलर प्लांट चे अपेक्षित आयुष्य हे २५ वर्ष शासनाकडून देण्यात आले आहे. त्यानुसार हिशोब केला तर २५ वर्षासाठी तुम्हाला दररोज फक्त ८ रुपये घरातील विजेसाठी मोजावे लागणार आहेत.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना आवश्यक कागदपत्रे | Documents Required for PM Suryoday Yojana 2024

प्रधानमंत्री सूर्योदय योजना अंतर्गत तुम्हाला लाभ मिळवण्यासाठी खालील कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

☞ आधार कार्ड

☞ पत्त्याचा पुरावा

☞ वीज बिल

☞ उत्पन्न प्रमाणपत्र

☞ मोबाईल नंबर

☞ बँक पासबुक

☞ पासपोर्ट आकाराचा फोटो

☞ शिधापत्रिका

How to Apply for Pm Suryodaya Yojana: 

अर्ज कसा करायचा? 

मंडळी, या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी या योजनेच्या अधिकृत वेबसाईटची घोषणा अजून सुद्धा झालेली नाही. तत्पूर्वी, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा ऑनलाइन लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला रूप-टॉप सोलर योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागेल. वेबसाईट 👉 https://solarrooftop.gov.in/
आत्ता तुमच्यासमोर Home पेज ओपन होईल त्यामध्ये Apply या पर्यायावर ती क्लिक करायचे आहे.
समोर आलेल्या पर्यायांमध्ये तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा सोबतच उर्वरित माहिती प्रविष्ट करा.
त्यानंतर आता तुमचा विज बिल क्रमांक भरा. PM Suryoday Yojana 2024
खाली वीज खर्चाची माहिती आणि मूलभूत माहिती भरल्यानंतर सौर पॅनल तपशील प्रविष्ट करा.
पुढे तुम्हाला तुमच्या छताचे क्षेत्रफळ मोजून माहिती भरायची आहे.
तुम्हाला तुमच्या छताच्या क्षेत्रानुसार सोलर पॅनल निवडून लावावे लागतील.
त्यानंतर आवश्यक कागदपत्रे अपलोड करा. बँकेचा तपशील भरा आणि अर्ज सबमिट करा.
आत्ता तुमच्या अर्जाची छाननी झाल्यानंतर सरकार या योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करेल.

तर मंडळी, PM Suryoday Yojana 2024 या योजनेची ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. सोबतच या योजनेअंतर्गत नवीन अपडेट साठी आमच्या या वेबसाईटला पुन्हा एकदा नक्की भेट द्या. ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.

(धन्यवाद:- टीम माहिती हक्काची)