महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना 2024 | MahaDBT Farmer Scheme List , महाडीबीटी लॉटरीची नवीन लिस्ट/यादी आली, येथे पहा आणि डाउनलोड करा

नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्रांनो शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना शासनातर्फे राबवल्या जातात. यामध्येच एक योजना म्हणजे MahaDBT Farmer Scheme होय. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विविध शेती आवश्यक अवजारे, पॉवर टिलर, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे, पाईप, फळबाग लागवड सोबतच शेती संबंधित इतर अवजारे आणि यंत्रांसाठी शासनाकडून खास सबसिडी दिली जाते. शासनाच्या या वेबसाईटवर शेतकऱ्यांना प्रथम आपली नोंदणी करावी लागते. त्यानंतर आपल्याला ज्या आजारांची गरज आहे, त्याची माहिती द्यावी लागते. त्यानंतर लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांची निवड करून MahaDBT Farmer Schese List जाहीर केली जाते. त्यांतर पत्र लाभार्थ्यांना त्या वस्तूंचे वाटप केले जाते.

ज्या शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत अर्ज केले असतील. तर त्या शेतकरी बांधवांना समजत नाही की त्यांची त्या योजनेअंतर्गत लॉटरी पद्धतीने निवड झाली आहे की नाही? त्यासाठी आपण सोप्या पद्धतीने आपली निवड या योजनेअंतर्गत झाली आहे की नाही? महाडीबीटी शेतकरी यादी कसे पाहायचे या संबंधित संपूर्ण माहिती घेणार आहोत तरीही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना अर्ज | MahaDBT Farmer Login

शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या MahaDBT Farmer Scheme 2024 या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी यंत्रांच्या खरेदीवर आर्थिक सहाय्य दिले जाते. यामध्ये अनुसूचित जाती/जमातीच्या शेतकऱ्यांना ५०% आणि इतर प्रवर्गातील शेतकऱ्यांना ४०% अनुदान दिले जाते. सध्या या योजनेअंतर्गत बऱ्याचशा शेतकऱ्यांना फायदा सुद्धा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना ठरत आहे.

महाराष्ट्र शासनाने सुरू केलेल्या महाडीबीटी पोर्टल शेतकरी योजना या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांसमोरील आव्हाने दूर करणे आणि शाश्वत कृषी पद्धतीच्या शेतीला प्रोत्साहन देणे हे आहे. हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून शेतकऱ्यांना विविध कृषी योजना, कृषी अनुदान सोबतच राज्य सरकारने प्रदान केलेल्या लाभांशी जोडते.

योजनेचे नाव MahaDBT Scheme” महाडीबीटी योजना
अधिकृत वेबसाईट  MahaDBT Farmer Portal
लाभार्थी शेतकरी (महाराष्ट्र राज्य)
अर्ज प्रक्रिया ऑनलाईन

 

शेतकरी मित्रांनो अनेक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर शेती विषयक अवजारांसाठी आणि योजनांसाठी अर्ज केलेले आहेत. कारण या महाडीबीटी पोर्टलमुळे शेतकऱ्यांना योजनेसाठी अर्ज करण्यात सोपे झाले आहे. कारण या पोर्टलवरून एकाच अर्जाद्वारे अनेक योजनांसाठी शेतकरी अर्ज करू शकतात.
वर शेतकऱ्यांनी अर्ज केल्यानंतर ज्या शेतकऱ्यांची या योजनेअंतर्गत निवड झाली आहे त्या शेतकऱ्यांना मोबाईलवर मेसेज द्वारे कळवले जाते. ज्या शेतकऱ्यांची निवड झाली आहे, त्या शेतकऱ्यांनी संबंधित योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करायची असतात.
लाभार्थी शेतकरी बांधवांनी कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्यानंतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते. त्यानंतर शेतकऱ्याला पूर्वसंमती पत्र दिले जाते. शेतकऱ्यांना काही कारणास्तव मोबाईलवर मेसेज आला नसेल, तरीसुद्धा ते त्यांच्या मोबाईलवर ऑनलाइन पद्धतीने लॉटरी पाहू शकतात. हे पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी ज्या पोर्टलवर अर्ज केले आहे, तेथे लॉगिन करून तपासायचे असते. आणि योजनांची लॉटरी पद्धतीने आलेली यादी मोबाईलवर डाऊनलोड सुद्धा करता येते.

महाडीबीटी लॉटरी यादी मोबाईल वरून कशी पहायची? | mahadbt farmer scheme list 2024

शेतकरी मित्रांनो महाडीबीटीची नवीन लॉटरी लिस्ट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी सर्वप्रथम मोबाईल मध्ये https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/ ही अधिकृत लिंक ओपन करायची आहे.

आता तुम्हाला लॉटरी यादीअर्जाची सद्यस्थिती हे दोन पर्याय पाहायला मिळतील.

यामध्ये तुम्हाला लॉटरी यादी हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे.

आता पुढे तुम्ही चालू वर्ष निवडायचे आहे. किंवा तुम्हाला ज्या वर्षाची यादी पाहिजे आहे ते वर्ष निवडायचे आहे.

पुढे योजना पर्याया मधून कोणत्या योजनेची लॉटरी निवड mahadbt farmer scheme list यादी पाहायची आहे ती योजना निवडायची आहे.

आता यामध्ये मुख्य घटक महिना जिल्हा तालुका निवडून शोधा बटन वर क्लिक करायचे आहे. आता योजनेची लॉटरी यादी तुमच्यासमोर ओपन झालेली असेल.

अशाप्रकारे यादीमध्ये शेतकरी आपले नाव तपासू शकतात.

सध्याचे नवीन खाली दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करा.

डाउनलोड लिंक 

तर शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे डाउनलोड कशी करायची? यासंबंधीची संपूर्ण माहिती दिलेली आहे. आशा करतो की, ही दिलेले माहिती तुम्हाला आवडली असेल. ही महत्त्वाची माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवायला मदत करा.

(धन्यवाद – टीम माहिती हक्काची)