महिलांना मिळणार पिठाची गिरणी, असा करा अर्ज, मिळणार ९०टक्के अनुदान | Flour Mill Yojana Maharashtra 2024

Flour Mill Yojana Maharashtra 2024 : नमस्कार मंडळी, ग्रामीण भागातील महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी महाराष्ट्रात महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी ही योजना राबवली जात आहे. आज आपण या योजनेसंदर्भात संपूर्ण माहिती घेणार आहोत. ही योजना नक्की काय आहे? या योजनेसाठी कोण पात्र आहे? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा आणि लाभ कसा घ्यायचा? या संदर्भात संपूर्ण माहिती आजच्या या लेखामार्फत आपण घेणार आहोत.

Flour Mill Scheme 2024 : पिठाची गिरणी योजनेत अर्ज कसा करावा?पिठाची गिरणी अनुदान योजना 2024 पहा संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी

मोफत पिठाची गिरणी योजना काय आहे ? | Flour Mill Yojana Maharashtra 2024

मंडळी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, सदर Flour Mill Yojana Maharashtra 2024 योजना महिला व बालकल्याण विभाग यांच्या अंतर्गत राबविण्यात येते. महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. सध्या पुणे, सातारा, बुलढाणा या जिल्ह्यांच्या महिला बालकल्याण विभाग जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत जिल्हा परिषद सेस २०२३-२४ अंतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजना म्हणजेच direct benefit transfer (DBT) द्वारे राबवण्यासाठी अटी व शर्तींच्या अधीन राहून ग्रामीण भागातील महिला व मुली यांच्याकडून अटी व शर्तीनुसार दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ ते २२ फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे.

या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील अपंग महिला व मुलींना पिठाची गिरणी पुरवणे सोबतच ग्रामीण भागातील महिला व मुलींना पिको व फॉल मशीन पुरवणे या दोन मुख्य योजना राबवल्या जातात.

योजनेचे नाव पिठाची गिरणी योजना २०२४
विभाग महिला व बालकल्याण विभाग
जिल्हा पुणे, सातारा, बुलढाणा
 अनुदान ९० टक्के अनुदान

 

पिठाची गिरणी योजनेसाठी पात्रता,शर्ती व अटी काय असणार आहे? Flour Mill Yojana Maharashtra 2024

मंडळी, जिल्हा परिषद तर्फे राबवल्या जाणाऱ्या या योजने अंतर्गत लाभ घेण्यासाठी काही पात्रता नियम आणि अटी ठेवल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे..-
१) ही योजना फक्त महाराष्ट्रातील ठराविक जिल्हा परिषदेत मार्फत राबविण्यात येत आहे. यासाठी फक्त महाराष्ट्रातीलच महिला लाभ घेऊ शकतात. Flour Mill Yojana Maharashtra 2024
२) पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न १ लाख २० हजारच्या आत असावे. सोबत तहसीलदार यांचे मागील आणि या वर्षाचे वैध उत्पन्न प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

प्रधानमंत्री सूर्योदय योजना ऑनलाईन अर्ज कसा करावा | PM Suryoday Yojana 2024 | प्रधानमंत्री सूर्योदय योजना काय आहे? कोणाला मिळेल लाभ ? असा करा अर्ज

३) अर्जदार हा ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
४) अर्जदाराच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती शासकीय/ निमशासकीय / जिल्हा परिषद / पंचायत समिती / ग्रामपंचायत सदस्य या सेवेत नसावी. यासंबंधी ग्रामसेवक यांचा दाखला अर्जासोबत जोडावा.
५) अर्जदाराचे वैयक्तिक बँक खाते राष्ट्रीयकृत बँकेत असावे. त्यासोबत मोबाईल क्रमांक,आधार कार्ड आणि पॅन कार्ड जोडलेले असावे.
६) लाभार्थी अपंग असल्यास त्यासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे अनिवार्य आहे.
७) लाभार्थ्याचे वय हे १७ ते ४५ वर्ष दरम्यान असावे त्यापेक्षा जास्त किंवा कमी नसावे.

मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे

Flour Mill Yojana Documents List 2024

मंडळी, या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी भारताचे PDF स्वरूपातील फाईल खाली दिलेले आहे. तिथून ती फाईल डाऊनलोड करून त्याची प्रत त्यावर लिहिलेला संपूर्ण मजकूर भरायचा आहे.

यासोबत खाली दिलेले सर्व कागदपत्रे अर्जदाराने स्वतः स्वाक्षरी करून अर्जासोबत जोडायचे आहेत.
अर्जदाराचा वयाचा पुरावा. Flour Mill Yojana Maharashtra 2024
अर्जदार शेतकरी आत्महत्याग्रस्त / अपंग / विधवा / दारिद्र्यरेषेखालील असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडावे.
अर्जदाराचा उत्पन्नाचा दाखला किंवा कुटुंबातील व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला असल्यास सोबत रेशन कार्ड झेरॉक्स जोडणे आवश्यक.
अर्जदार यांच्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत.
अर्जदाराचे बचत खाते असलेल्या बँक खात्याच्या पुस्तकाचे पहिल्या पानाची झेरॉक्स प्रत ज्यामध्ये खाते क्रमांक आणि IFSF कोड नमूद असावा
विजेच्या बिलाची प्रत.
अर्जासोबत पासपोर्ट आकारचा फोटो.

मोफत पिठाची गिरणी योजना महाराष्ट्र अंतर्गत ऑफलाईन अर्ज करण्याची पद्धत

 पिठाची गिरणी योजनेअंतर्गत लाभ घेण्यासठी खाली 3 जिल्ह्यातील अर्ज नमुना दिला आहे. फक्त त्याच जिल्ह्यातील पात्र लाभार्थी लाभ घेऊ शकतात.

जिल्हा परिषद  अर्जाची प्रत 
पुणे PDF डाउनलोड करा 
सातारा PDF डाउनलोड करा
बुलढाणा PDF डाउनलोड करा

 

वर दिलेल्या लिंक वरून अर्ज डाऊनलोड करायचा आहे. त्यानंतर अर्जाची प्रत काढून अर्ज संपूर्ण भरायचा आहे.
अर्जासोबत सांगितलेली सर्व कागदपत्रे जोडायची आहेत.
अर्जासोबत रंगीत फोटो आणि इतर कागदपत्रे जोडल्यानंतर हा अर्ज जिल्हा परिषद कार्यालयात जमा करायचा आहे.
त्यानंतर कार्यालयांमध्ये अर्जाची छाननी केली जाते. तुमचा अर्ज योग्य असेल आणि तुम्ही या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर तसे तुम्हाला मेसेज द्वारे कळवले जाते. त्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण करून तुमच्या बँक खात्यात अनुदानित रक्कम जमा केली जाते.

तर मंडळी, या संदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जिल्हा परिषद कार्यालयामध्ये माहिती घेऊ शकता.
हे महत्त्वाची Flour Mill Yojana Maharashtra 2024 माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आमच्या वेबसाईटला पुन्हा एकदा नक्की भेट द्या.

(धन्यवाद:- टीम माहिती हक्काची)