कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 यादी | kusum solar yojana 2023 list , नवीन कुसुम सोलार योजनेची जिल्ह्यानुसार यादी अशी पहा

नमस्कार मंडळी, केंद्र सरकार शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवून महत्त्वाची पावले उचलत आहे. kusum solar yojana 2023 list अशातच शेतावरील खर्च कमी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात वीज पुरवठा निश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण योजना केंद्र सरकार द्वारे राबवली जात आहे. ती योजना म्हणजे पीएम कुसुम योजना Kusum Solar Yojana. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतात सौर पंप बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते.

आजच्या या लेखात आपण पाहणार आहोत kusum solar yojana 2023 list कशी पहायची? तरी तुम्ही सुद्धा या योजनेअंतर्गत नाव नोंदणी केली असेल तर यादीमध्ये तुमचे नाव असे तपासा. आणि यादी डाऊनलोड करा.

Kusum Solar Yojana | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र

केंद्र सरकारच्या या योजनेअंतर्गत आणि महाऊर्जा मार्फत कुसुम सोलर पंप योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना ३ एचपी ५ एचपी आणि ७.५ एचपी क्षमतेचा सौर कृषी पंपासाठी अर्ज करता येतो. यामध्ये खुल्या गटातील शेतकऱ्यांसाठी ९०% सबसिडी मिळते आणि १०% रक्कम भरायची असते. तर अनुसूचित जाती/जमाती मधील शेतकऱ्यांना ९५% सबसिडी आणि ५% रक्कम भरायचे असते. याचा फायदा प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना घेता येतो.

या योजनेसाठी कोणते शेतकरी अर्ज करू शकतात? पात्रता आणि नियम व अटी काय आहेत? अर्ज कसा करावा या संदर्भात संपूर्ण माहिती खाली दिलेल्या लिंक वर दिली आहे. 👇👇👇👇

 

कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन महाराष्ट्र | kusum solar yojana maharashtra

महाराष्ट्र कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर भेट द्यावी लागेल.
त्यानंतर तुम्हाला नवीन नोंदणी करावी लागेल.
येथे तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्यावी लागेल. जसे की, आपल्या शेतीची माहिती- सातबारा, अर्जदाराचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक भरावा लागेल. kusum solar yojana 2023 list
त्यानंतर आपल्या मोबाईल क्रमांकावर आलेल्या OTP च्या साहाय्याने पुढील प्रक्रिया करायचे असते.

kusum solar yojana 2023 list | कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र 2023 यादी

शेतकरी मित्रांनो कुसुम सौर पंप योजनेअंतर्गत पात्र झालेल्या शेतकरी बांधवांच्या सोलर यादी 2023 प्रसिद्ध झाल्या आहेत. या याद्या आपण जिल्हा निहाय ऑनलाइन पद्धतीने कशा पाहायच्या आणि सर्व जिल्ह्यांच्या kusum solar approved list pdf आपण मोबाईल मध्ये कशा डाऊनलोड करायच्या हे आता पाहणार आहोत.
शेतकरी मित्रांनो या अगोदर सुद्धा अनेक शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत लाभ झाला आहे. परंतु काही शेतकऱ्यांना अजून या योजनेचा लाभ घेता आला नाही. कारण या योजनेमध्ये प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाते. या योजनेअंतर्गत अनेक शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आणि त्यांच्या शेतात सौर कृषी पंप सुद्धा बसवण्यात आले आहेत.

kusum yojana 2023 maharashtra list | कुसुम सोलर पंप योजना गावानुसार यादी आली

शेतकरी मित्रांनो, कुसुम सोलार पंप योजनेअंतर्गत चालू वर्षातील नवीन गावानुसार यादी कशी पहायची? हे आता आपण पाहूया.

🔔 सर्वप्रथम आपल्याला PM किसान ऊर्जा सुरक्षा एवं उत्तम अभियान यांच्या अधिकृत वेबसाईटवर जायचं आहे लिंक खाली दिलेली आहे.

https://pmkusum.mnre.gov.in/landing-Public_Information.html

🔔 येथे गेल्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य (MAHARASHTRA) निवडायचे आहे.
🔔 त्यानंतर आपला जिल्हा निवडायचा आहे.
🔔 पुढे कोणत्या पंपासाठी आपण अर्ज केला आहे जसे की, 3Hp, 5Hp, 7.5 Hp हे निवडायचा आहे.
🔔 वरील सर्व माहिती निवडल्यानंतर GO बटन वर क्लिक करा.
🔔 आता तुमच्यासमोर तुमच्या जिल्ह्यातील गावानुसार यादी ओपन झालेली आहे.

शेतकरी मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना अंतर्गत अर्ज केला असेल आणि तुम्हाला तुमचे नाव यादीत आले आहे का नाही? हे तपासायचे असेल तर अशा प्रकारे तुम्ही जिल्हा आणि गावानुसार यादी kusum solar yojana 2023 list  तुमच्या मोबाईलवर पाहू शकता, आणि कुसुम सोलर पंप योजना महाराष्ट्र यादी डाऊनलोड सुद्धा करू शकता.

ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ही महत्त्वाची माहिती इतर शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा.

(धन्यवाद:-  टीम माहिती हक्काची)